*ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर यांची मागणी
*💫सावंतवाडी दि.१९-:* आज पर्यंत जुन महिन्यात पावसाची सुरुवात होत होती. परंतु सद्य स्थिती बदलली असून, अवकाळी रित्या पर्जन्यमान होत आहे. या संदर्भात अधिक माहिती संबंधित पर्जन्य सूची दर्शक खात्याने शोधून काढली पाहिजे. अशी मागणी ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट तर्फे प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर यांनी केली आहे. सद्य स्थितीत कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीत होणारी मनुष्य हानी आणि आता अवकाळी अतिवृष्टीमुळे होणारी आपत्कालीन परिस्थिती या संदर्भात प्रत्येक भागात आपल्या सर्वांच्या सामाजिक व आर्थिक मदतीची गरज सर्वसामान्य माणसाला आवश्यक आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी आवश्यक त्या शासकीय संस्थेकडे लेखी स्वरूपात प्रस्ताव दाखल करून संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून पीडित व आपत्ती ग्रस्त जनतेला न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न करावा अशी मागणी ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्ट प्रदेश सहसचिव अमित वेंगुर्लेकर यांनी केली आहे.
