अँड. परिमल नाईक यांच्या माध्यमातून व्यवस्था
*💫सावंतवाडी दि.१८-:* कोल्हापूर येथे उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आपल्यामार्फत मोफत जेवण पुरविण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक अँड. परिमल नाईक यांनी दिली. कोविड-१९च्या उपचारासाठी कोल्हापूर शहरात बरेच गंभीर रुग्ण उपचार घेत आहेत. दाखल असलेल्या रुग्णांना हॉस्पिटल मध्ये जेवण खाण्याची व्यवस्था करण्यात येते. शासनाच्या निर्बंध व नियमानुसार बाजारपेठा व हॉटेल्स ही पूर्ण वेळेत खुली नसल्याने रुग्णांसोबत असणाऱ्या नातेवाईकांना जेवणाअभावी उपाशी राहाव लागत असल्यामुळे त्यांचे अतोनात हाल होत आहेत. ही बाब अँड. परिमल नाईक, यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोल्हापूर येथे दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी त्यांच्या मार्फत मोफत जेवण पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या करिता गरजवंतांनी अँड. परिमल नाईक – ९४२२४३६८०५ व संतोष (आप्पा ) लाड- ९४२२५२२५२५ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
