नगरपरिषदेच्या माध्यमातून जिमखाना येथे २५ बेडचे कोविड केअर सेंटर लवकरच सुरू…

राजन तेलींसह नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी_

*💫सावंतवाडी दि.१८-:* सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून जिमखाना मैदान बॅडमिंटन हॉल येथे २५ ऑक्सिजन बेडच कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १० दिवसांत हे सेंटर उभारण्यात येणार असून रूग्णांना मोफत वैद्यकीय सेवा मिळणार आहे या कामाची पाहणी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी केली. यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, आनंद नेवगी, केतन आजगावकर आदी उपस्थित होते. कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यात आयुर्वेद कॉलेज, जिल्हा परिषद, खासगी डॉक्टर, भाजप व सर्व संस्थांच सहकार्य मिळणार असल्याचे सांगण्यात आले. .

You cannot copy content of this page