खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील या कामांसाठी कोट्यावधीच्या निधी..
⚡देवगड ता.०८-:
देवगड तालुक्यात गाबित समाजाचा एकूण १९ वाड्या आहेत.या सर्व वाड्या खाडी किनाऱ्यालगतचं आहेत.त्याचा आतपर्यंत कधी सर्वे झाला नाही. त्यामुळे या भागाची पाहणी करून त्याचा सर्वे करण्यात यावा अशी मागणी आम्ही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला केली होती. खाडी किनारपट्टी भागात असलेल्या गाबीत समाजाची परिस्थिती आतापर्यंत कोणीच पाहिली नव्हती. त्यामुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या वादळवाऱ्यामुळे उधाणाचे पाणी वस्तीत घुसून मच्छीबार बांधवांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशा परिस्थितीत मच्छीमार बांधव अनेक वर्ष संघर्ष करत असतात. मच्छीमार बांधवांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने यासाठी मेरीटाईम बोर्डाच्या मार्फत या ठिकाणी संरक्षण भिंत बांधणे ही काळाची गरज होती .तसेच जेटी बांधणे हे दोन विषय महत्त्वाचे होते.ते आम्ही प्रथम खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिले.यासाठी देवगड तालुक्यातील सर्व मच्छीमार बांधव संघटित झालो.त्यानंतर महाराष्ट
मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून १९ वाड्यांच्या सर्वे करून घेतला. सर्वेक्षणानंतर एकत्रित प्रस्ताव करून वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आले होते. या कामी पालकमंत्री नितेश राणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. असल्याचे प्रतिपादन गाबीत समाज समस्या निवारण मंचचे अध्यक्ष सुनील जोशी यांनी केले.
महाराष्ट शासन मेरीटाईम बोर्ड यांच्या माध्यमातून पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच गाबीत समाज समस्या निवारण मंचचे अध्यक्ष सुनील जोशी यांच्या केलेल्या पाठपुराव्यामुळे मळई येथील मशीद ते जुवाटकर घरापर्यंत रस्ता व संरक्षण भिंत या दोन कामाच्या भूमिपूजन गाबीत समाज समस्या निवारण मंचचे अध्यक्ष सुनील जोशी व नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान व्यासपीठावरून जोशी बोलत होते.
याप्रसंगी देवगड जामसंडे नगरपंचायत नगराध्यक्षा साक्षी प्रभू,नगरसेवक रोहन खेडेकर, माजी उपसरपंच माधव कुलकर्णी,माजी उपनगराध्यक्ष उमेश कनेरकर,गाबीत समाज समस्या निवारण मंचचे सभासद शिवाजी कांदळगावकर, उल्हास मणचेकर, संतोष जुवाटकर,सोनू मालवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जोशी पुढे म्हणाले ,या केलेल्या सर्वेक्षणात नंतर एकूण १९ प्रस्ताव करून वरिष्ठांकडे पाठविण्यात आली. या पाठविलेल्या १९ प्रस्तावांपैकी जवळपास १२ प्रस्ताव मंजूर झाले असून याकामी कोटीचां निधी मंजूर झाला.त्यात मळईसाठी जवळपास दहा कोटीचा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सर्व कामांचा एकत्रित भूमीपूजन करण्याच्या आमच्या मानस होता.मात्र पालकमंत्र्यांनी खाडी किनारपट्टी भागातील या कामांना विलंब करू नका.
पावसाळ्यात पावसा अभावी कामे थांबली अशी समस्या निर्माण होऊ नये म्हणून स्थानिक पातळीवर ग्रामस्थांनी ठरवून आपणच भूमिपूजन करा अशी सूचना केली आणि त्यानंतर आज या कामाचे भूमिपूजन करत असल्याचे यावेळी सुनील जोशी यांनी सांगितले.यातील सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर गाबीत समाजाच्या वतीने मोठा सत्कार मत्स्य व्यवसाय बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा आम्ही करणार असल्याचेही यावेळी गाबीत समाज तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष सुनील जोशी यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा मळई ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.दीक्षा सारंग, राजाराम कोंयडे, सत्यवान मणचेकर,अजित कोंयडे, नंदकिशोर भाबल, विनोद कोयंडे, बाळकृष्ण राजम,कमलाकर मोंडकर, सुदाम कोयंडे, उमेश भाबल, जैनुद्दीन जमादार,बाबाजी ढोके,उर्मिला भाबल, मनस्वी उपरकर,अपर्णा कोंयडे, अनिकेत कोयंडे, रुपेश मणचेकर, हर्षल मणचेकर, प्रमोद मणचेकर, जयप्रकाश कोयंडे, भूषण भाबल, पंढरीनाथ मणचेकर,दीपक सारंग आदी उपस्थित होते.
