आचिर्णे उपकेंद्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ..

*💫वैभववाडी दि.१५-:* कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा आचिर्णे उपकेंद्रात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लसीकरणन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.आचिर्णे येथे लसीकरण केंद्र सुरू होण्यासाठी अतुल रावराणे यांनी मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार शुक्रवारी आचिर्णे उपकेद्रांमध्ये लसीकरणचा पालकमंत्र्यांनी शुभारंभ केला. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी मंडप व २५ खुर्च्यांची सोय करावी,सर्व लसीकरण केंद्रावर प्राथमिक सुविधा उपलब्ध असाव्यात. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सुचना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल पवार यांना पालकमंत्र्यांनी दिल्या . यावेळी प्रांतधिकारी वैशाली राजमाने ,जिल्हा नियोजन समिती सदस्य अतुल रावराणे, संदेश पारकर,तहसीलदार रामदास झळके,सहाय्यक गटविकास अधिकारी शुभदा पाटील,आचिर्णे सरपंच रुपेश रावराणे,माजी सभापती लक्ष्मण रावराणे, प.स.सदस्य मंगेश लोके, ग्रा.प.सदस्य महेश रावराणे,शहरप्रमुख प्रदीप रावराणे ,माजी नगराध्यक्ष रविंद्र रावराणे, संजय चव्हाण, दिपक गजोबार,बयाजी बुराण,संतोष बोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page