चौके प्रा.आ. केंद्रासाठी दिलेल्या नवीन रुग्णवाहिकेचे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत लोकार्पण…

*💫मालवण दि १५-:* आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतुन चौके प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली असून आज या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. चौके प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका देण्याची मागणी करण्यात आली होती. आ. वैभव नाईक यांनी याची दखल घेऊन हि मागणी पूर्ण केली आहे. त्यामुळे रूग्णांना याचा लाभ होणार आहे. याप्रसंगी आ. वैभव नाईक यांनी चौके प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा घेतला. कोविड रुग्ण तसेच औषध पुरवठा याबाबत माहिती जाणून घेतली. कोविड साखळी तोडण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमख हरी खोबरेकर, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, संजय गावडे, बीजी गावडे,वैद्यकीय अधिकारी प्रणव पोळ, डॉ. परब, आरोग्य सहाय्यक आर. एस. रणसिंग, आरोग्य सहाय्यीका एस.बी. वसावे, आरोग्य सेविका एस. एस. सुतार. आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page