आंबोलीत गडगडाटासह मुसळधार पाऊस

*ग्रामस्थांची उडाली तारांबळ*

*💫आंबोली दि.१५-:* परिसरात ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याच्या वारा सह मुसळधार पाऊस बरसला. संपूर्ण एप्रिल आणि मे महिन्यात यावर्षी दुपारनंतर २ दिवस आड पाऊस पडतो. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. सरपण भरणे,पावसाळ्याची झडपे,पूर्वतयारी सुरुवात झाली आहे. या वर्षी कोरोना मुळे आधीच गांजवलेल्या लोकांना पावसानेही धक्का दिला. त्यामुळे कही खुशी कही गम असाच नुर दिसत आहे.येथील फौजदार वाडी येथील पुल ६महिने काम करत असूनही ठेकेदाराच्या हलगर्जीपणा मुळे रखडले आहे.त्यावर स्लॅब घातला नाही.येथे बिहारी कामगार ठेवले असून बिनकामी ठेवले आहेत ठेकेदाराने बिहाऱ्यानकडून बोगस काम न करता चांगले काम करावे. रावटी उचलावी.चांगले कामगार ठेवून काम करावे अन्यथा चोप देण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.पावसाळ्यापूर्वी रस्त्यात होणारा चिखल तसेच पुलाचे योग्य काम ठेकेदाराने करावे असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.२ वर्षांपूर्वी गावठाण वाडीत ठेकेदाराने यापेक्षा उंच आणि चांगले काम पाण्यात असूनही २ महिन्यात चांगले काम पूर्ण केले होते.त्यामुळे ग्रामस्थांनी इशारा दिला आहे

You cannot copy content of this page