दुर्मिळ रक्तगट बी निगेटीव्ह रक्तदाते देऊन जीवदान…

मनोहर दामले, सिद्धेश सावंत यांनी जपले ‘रक्ताचे’ नाते;दुर्मिळात दुर्मिळ रक्ताची होती आवश्यकता

*💫मालवण दि.१५-:* आज सावंतवाडी येथील डॉ. देशपांडे रुग्णालयात श्री.विजय प्रभू या रुग्णाना बी निगेटिव्ह या दुर्मीळ रक्तगटाची तातडीने आवश्यकता होती.त्यांनी मदतीसाठी युवा रक्तदाता संघटनेला हाक दिली.आणि युवा रक्तदाता संघटना रुग्णाच्या मदतीला नेहमीप्रमाणे धावून जात दुर्मिळात दुर्मिळ असलेला बी निगेटिव्ह हा रक्तगट उपलब्ध करून दिला. रक्तदात्यांमध्ये कुडाळ येथील श्री. मनोहर दामले आणि सावंतवाडी येथील श्री सिद्धेश सावंत यांचा समावेश आहे.युवा रक्तदाता संघटनेने कुडाळ येथे जात रक्तदात्याना आणण्याची व्यवस्था केली. श्री. मनोहर दामले आणि श्री सिद्धेश सावंत यांचे त्यानी ‘रक्ताचे नाते’ जपल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान सावंतवाडी तहसीलदार श्री.राजाराम म्हात्रे,युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष श्री.देव्या सूर्याजी,माजी शिक्षण आरोग्य सभापती श्री. मंगेश तळवणेकर,इ.च्या उपस्थितीत रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला.युवा रक्तदाता संगटनेने तसेच रुग्णाच्या नातेवाईकांनी रक्तदात्यांचे आभार मानले.यावेळी वेंगुर्ले येथील निखिल सिध्दये,अनिकेत पाटणकर,अवधूत गावडे,यांचे सहकार्य लाभले. रक्तदान केलेले रक्तदाते आणि युवा रक्तदाता संघटनेविषयी तहसीलदार म्हात्रे यांनी गौरवोद्गार काढले.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून युवकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page