मळेवाड येथील श्री देव नाईक वस वार्षिक जत्रौत्सव आज…

⚡सावंतवाडी ता.०४-: मळेवाड जकातनाका (नाईकवाडी )येथील श्री देव नाईक वस वार्षिक जत्रौत्सव आज रविवार दिनांक ४ जानेवारीला २०२६ रोजी होत असून सकाळी मंदिरात देवतांवर अभिषेक,धार्मिक कार्यक्रम त्यानंतर केळी ,नारळ ठेवणे,ओटी भरणे गाऱ्हाणे घालणे आदी कार्यक्रम होणार असून रात्रौ वालावलकर दशावतार नाट्य मंडळ,ओसरगाव यांचा नाट्य प्रयोग होणार आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी या वार्षिक जत्रौत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन येथील ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page