चक्रीवादळाची पार्श्वभूमी , नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
*💫सिंधुदुर्ग दि.१५ प्रसन्न गोंदावळे-:* चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज किनारपट्टी भागाची पाहणी केली असून, यावेळी त्यांनी नागरिकांना आज पासून पुढील दोन दिवस सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज सायंकाळपासून जिल्ह्याच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, आज पासून मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे तसेच स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक देखील उपस्थित होते.
