⚡कणकवली ता.२९-: भिरवंडे वरची परतकाम वाचुकले वाडी खिश्चन समाजाने विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांच्याकडे पाण्याच्या टाकीवर झाकण लावणे, वाचुकले वाडी रस्ता डांबरीकरणे करणे, रस्त्यावर स्ट्रीट लाईट बसविणे, आणि झरीचो खुरिस येथे शौचालय व चेंजिंग रूम बांधणे या कामांची मागणी केली होती. त्याचवेळी संदेश सावंत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधून या समाजाच्या मागण्या संदर्भात या ग्रामस्थांसमोर बोलणी केली होती. त्यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्व कामे पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे वाचूकलेवाडी रस्ता डांबरीकरण करणे या कामासाठी पाच लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
तसेच स्ट्रीट लाईट मंजूर केली आहे, तसेच उर्वरित कामासाठी कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर लगेच निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांनी दिले आहे. तसेच पाण्याच्या टाकीवर झाकण बसविणे हे काम माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांनी स्वखचानें केले आहे. या रस्ता डांबरीकरण करणे या रस्ता कामाचा शुभारंभमाजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांच्या उपस्थितीत मुंबई पोलीस दलातील निवृत्त पोलीस अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते थॉमस डिसोझा यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आद्राव डिसोझा, गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, विनय सावंत, प्रकाश सावंत, श्रीकांत सावंत, आशिष सावंत, बल डिसोझा, जॉर्जी डिसोझा तसेच ग्रामस्थ व महिलावर्ग उपस्थित होते. यावेळी दिलेल्या शब्दप्रमाणे कामांची पूर्तता केल्याबदल पालकमंत्री नितेश राणे व माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले असून यापुढे आमचा समाज पालकमंत्री नितेश राणे व माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत यांच्या कायम पाठीशी राहणार अमल्याची ग्वाही दिली.
