कोल्हापूर–पणजी एसटी बस पुन्हा सुरू; प्रवाशांना दिलासा…

⚡दोडामार्ग ता.२८-:
गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली कोल्हापूर–गडहिंग्लज–चंदगड–तिलारी–दोडामार्ग मार्गे पणजी जाणारी एसटी बस प्रवाशांच्या सोयीसाठी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या बसचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर विभाग नियंत्रण व कागल आगार प्रशासनाने केले आहे.
कोल्हापूर येथून ही बस सकाळी ६ वाजता सुटणार असून तिलारी घाट मार्गे पणजी येथे पोहोचेल. पणजी येथून सायंकाळी माघारी सेवा उपलब्ध राहणार आहे. बससंख्या अपुरी व इतर कारणांमुळे कागल आगाराची ही बस बंद होती. मात्र सरकारी कर्मचारी, विद्यार्थी व नियमित प्रवाशांकडून बस सुरू करण्याची मागणी होत होती.
या मार्गावरील सेवा सुरू झाल्याने कोल्हापूर, गडहिंग्लज, चंदगड व तिलारी परिसरातील प्रवाशांना जवळच्या मार्गाने पणजीला जाण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page