⚡दोडामार्ग ता.२८-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या आयी कुंभारवाडी येथील सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या सभामंडपामुळे गावातील सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक उपक्रमांसाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे.
भूमिपूजन सोहळ्यास शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, उपतालुका प्रमुख बबलू पांगम, सरपंच संघटना अध्यक्ष अनिल शेटकर, शाखाप्रमुख विनोद बेळेकर यांच्यासह आयी गावाचे सरपंच तुषार नाईक, उपसरपंच भदी गवस व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
या विकासकामामुळे गावातील कार्यक्रम व सभा अधिक सुसूत्रपणे पार पडतील, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. कार्यक्रमास कुंभारवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयी कुंभारवाडी येथे सभामंडपाचे भूमिपूजन…
