खालची धाटवाडी येथील सार्वजनिक विहिरीच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन…

⚡दोडामार्ग ता.२८-: कसई-दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १४ खालची धाटवाडी येथील सार्वजनिक विहिरीच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन शुक्रवारी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
खालची धाटवाडी परिसरातील नागरिकांनी विहीर नूतनीकरणाची मागणी केली होती. त्या मागणीनुसार नगरपंचायतच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, मुख्याधिकारी संकेत गायकवाड, माजी सरपंच यशवंत बागकर, माजी सरपंच प्रतिभा नाईक, नगरसेविका स्वराली गवस, नगरसेविका संजना म्हावळणकर, माजी ग्रामपंचायत सदस्य स्नेहप्रभा सावंत यांच्यासह सुमित म्हाडगुत, उदय गवस, रामदास बागकर, कल्पेश गवस, सगुण मुळगावकर, चंद्राकर खडपकर, साजन गवस, संदीप सावंत, विनायक खडपकर, माजी नगरसेवक सुधीर पनवेलकर, जितेंद्र गवस, विराज सावंत, दिनकर उगवेकर, ओंकार कोळेकर, दिपेश म्हाडगुत, प्रदीप नाईक, प्रभाकर सावंत तसेच नगरपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या नूतनीकरणामुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे.

You cannot copy content of this page