शिंदे शिवसेनेच्या जोरदार घोषणांत व फटाक्यांच्या आतषबाजीत नगरपालिकेत प्रवेश; “जनतेचा विश्वास विकासकामांतून सार्थ ठरवू”; नगराध्यक्षा ममता वराडकर..
⚡मालवण ता.२५-: हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी… जय शिवाजी, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा विजय असो…. खासदार नारायणराव राणे यांचा विजय असो,एकनाथ शिंदे यांचा विजय असो, आमदार निलेश राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है…. दत्ता तिथे सत्ता या आणि अशा प्रकारच्या घोषणांनी आज आसमंत दणाणून सोडत फटाक्यांच्या आतषबाजीत शिंदे शिवसेनेच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिक यांच्या उपस्थितीत आज जल्लोशी वातावरणात मालवणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी मालवण नगरपालिकेत जात नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. मालवणच्या नूतन नगराध्यक्ष सौ ममता वराडकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्या तत्पूर्वी नगराध्यक्ष वराडकर यांनी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर वंदन करीत आणि नगराध्यक्षांच्या खुर्चीला नतमस्तक होत पदभार स्वीकारला यावेळी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, हितचिंतक नगरपालिका पदाधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पुष्पवृष्टी व औक्षण करीत नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर तसेच शिवसेनेचे नगरसेवक सहदेव बापर्डेकर, अश्विनी कांदळकर दीपक पाटकर भाग्यश्री मयेकर मेघा सावंत पुनम चव्हाण शर्वरी पाटकर नीना मुंबरकर महेश कोयंडे सिद्धार्थ जाधव यांचे नगरपालिकेत स्वागत करण्यात आले. माझा विजय हा जनतेचा विजय असून जनतेने माझ्यावर दाखविलेला विश्वास येत्या पाच वर्षात शहरातील विकासकामांच्या माध्यमातून आणि जनतेच्या सेवेतून सार्थ करून दाखवू, असा विश्वास यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, उमेश नेरुरकर, राजा गांवकर, बाळू तारी, बाळू नाटेकर परशुराम पाटकर अंकित नेरुरकर स्वप्नाली नेरूरकर जगदीश गावकर सूर्यकांत फणसेकर विश्वास गावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नगराध्यक्ष सो ममता वराडकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भाजप नगरसेवक मंदार केणी अन्वेशा आचरेकर महानंदा खानोलकर ललित चव्हाण तसेच उबाठा शिवसेना नगरसेवक तपस्वी मयेकर मंदार ओरसकर अनिता गिरकर, महेंद्र म्हाडगूत यांनी सौ ममता वराडकर यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले
