⚡कणकवली ता.२५-: तळेरे दत्तनगर येथे प्रीती ( दुर्गा ) देवेंद्र खटावकर (वय २९) हिने राहत्या घराच्या मजल्यावर अंगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी ९.२३ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
या घटनेची खबर मृत विवाहितेचे सासरे रंजन लक्ष्मण खटावकर (वय ६४) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. रंजन खटावकर यांना त्यांची नात सानवी हिने फोन करून आईने घराच्या वरच्या मजल्यावरील अँगलला गळफास घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तातडीने धाव घेऊन पाहणी केली असता प्रीती ( दुर्गा ) खटावकर यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत.
