ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.२५-: ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे हा सोहळा संपन्न झाला. यंदा या सोहळ्याचे २० वं वर्ष असून आजच्या सन्मान सोहळ्यात शुभेच्छा सावंत, कांचन उपरकर, स्नेहा कदम, मंदार चोरगे, सचिन वंजारी, राजाराम फर्जंद, शैलेश तांबे, रोहन पाटील, राजेश कदम, अविनाश म्हापणकर यांचा सन्मानपत्र, सन्मान चिन्ह व शाल देऊन जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत, ज्येष्ठ संपादक गजानन नाईक, सीए लक्ष्मण नाईक, श्रीराम वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष रमेश बोंद्रे, स्वागताध्यक्ष अभिमन्यू लोंढे, संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक, अध्यक्ष जावेद शेख, संपादक सागर चव्हाण, व्ही.टी. देवण, संप्रवी कशाळीकर आदी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. ज्येष्ठ संपादक गजानन नाईक म्हणाले, हा पुरस्कार म्हणजे दिलेली शाबासकी आहे. संस्थेच्या माध्यमातून समजाच ऋण फेडले जात असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच सीए लक्ष्मण नाईक, संप्रवी कशाळीकर, रमेश बोंद्रे आदींनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात विक्रांत सावंत म्हणाले, ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळान केलेल्या कार्याचा सार्थ अभिमान आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रात पैशाला महत्त्व असताना कार्यासाठी सन्मानित केलं जातं ही बाब उल्लेखनीय आहे. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात बऱ्याच अडचणींना सामोर जावं लागतं. ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला दाणोली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन , स्वागतगीत सादर केलं. प्रास्ताविकात ज्ञानदीपचे संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी मनोगत व्यक्त करत संस्थेचा आढावा घेतला. 19 वर्ष सातत्याने करत असल्याचा कार्याचा उल्लेख त्यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत गावडे तर आभार सहसचिव विनायक गांवस यांनी मानले. याप्रसंगी कार्याध्यक्ष निलेश पारकर, खजिनदार एस आर मांगले, उपाध्यक्ष एस जी साळगावकर, कवी विठ्ठल कदम, वैभव केंकरे, आर. व्ही. नारकर, सुनील नेवगी, दीपक गांवकर, सुनील कदम, पांडुरंग कातकर आदींसह ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page