प्रा आ केंद्रे व उपजिल्हा रुग्णालयात केले उपलब्ध;कणकवलीतील कोरोना रोखण्यासाठी घेतला निर्णय
*💫कणकवली दि.१४-:* तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव होत असल्याने आमदार नितेश राणे यांनी स्वखर्चाने कोरोना चे निदान लवकरात लवकर होण्यासाठी कणकवली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व कणकवली उपजिल्हा ग्रामीण रूणालय येथे रॅपिड अँटीजेन टेस्ट किट उपलब्ध करून दिले आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते डॉ. शिकलगार, व डॉ.सतीश टाक यांच्या कडे आज रॅपिड टेस्ट किट देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, संदीप मेस्त्री, पपू पुजारे,विजय चिंदरकर, समर्थ राणे,स्वप्नील चिंदरकर,सचिन पाराधिये,प्रसाद देसाई,अजय घाडीगांवकर,बाळा पाटील आदी उपस्थित होते.
