कोल्हापुर येथे उपचार सुरु असताना प्राणज्योत मालवली;जी प च्या माजी अध्यक्षा समिधा नाईक यांना पती शोक
*💫वेंगुर्ले दि.१४-:* वेतोरे गावचे रहिवासी माजी जिल्हा परिषद सदस्य समीर नाईक (वय ५२) यांचे कोल्हापूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर गेले काही दिवस उपचार सुरू होते. परंतु गुरुवारी रात्री ८:३० चा सुमारास उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे. जिल्हा परिषद माजी अध्यक्षा समिधा नाईक यांचे ते पती होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
