प्रसिद्ध उद्योजक शिवानंद भोसले यांनी जपली सामाजिक बांधिलकी

दोडामार्ग रुग्णालयाला दिले ५ ऑक्सीजन क्लोमिटर मशीन

*💫दोडामार्ग दि.१४-:* गोवा व दोडामार्ग येथील प्रसिद्ध उद्योजक तथा बांधकाम व्यावसायिक शिवानंद(शैलेश) भोसले यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय व कोव्हिडं हॉस्पिटलला आवश्यक असलेले ऑक्सिजन क्लोमिटर हे मशीन उपलब्ध करून दिले. यातील एकूण ०५ मशीन आज त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवळे यांच्याकडे सुपूर्त केली. शिवानंद भोसले हे गेली अनेक वर्षे समाजामध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून विविध प्रकारे लोकांची मदत करताना दिसत आहे. गेल्या लॉकडॉउन मध्ये त्यांनी अनेक लोकांना अन्नधान्याचा पुरवठा केला होता तसेच यावेळी मात्र कोरोना चा प्रभाव वाढल्यामुळे कोरोना रुग्णालय ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे त्यामुळे अनेक मृत्यू आतापर्यंत ओढवले आहे दोडामार्गात मात्र वेगळी परिस्थिती असून ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध आहेत मात्र सिलेंडरमधून ऑक्सिजन ज्या यंत्राद्वारे पुरवठा केला जातो ते ऑक्सिजन किलोमीटर यंत्र दोडामार्ग कोव्हिडं सेंटर हॉस्पिटल मध्ये दोनच होती त्यामुळे अनेक रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत होती हे त्यांना डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्यामार्फत कळताच तात्काळ एकूण पाच ऑक्सिजन किलोमीटर यंत्र ही भोसले यांनी उपलब्ध करून दिली. त्यामुळे ही रुग्णांना होणारी ऑक्सिजनची कमतरता दूर होणार असल्याचे यावेळी डॉक्टर ज्ञानेश्वर एवळे म्हणाले. शिवानंद (शैलेश) भोसले यांनी आरोग्यविषयक कोणतीही समस्या असल्यास थेट आपल्याशी संपर्क साधावा आपण ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू तसेच अजून दोन ऑक्सिजन क्लोमीटर यंत्र उपलब्ध करून देणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. शैलेश भोसले यांचे दातृत्व पुन्हा एकदा दिसून आले असून समाजातून त्यांचे अभिनंदन होत आहे अनेकांनी त्यांच्या या कार्याबद्दल आभार मानले आहे. शैलेश भोसले हे समाज प्रिय व्यक्ती असून त्यांनी गेली अनेक वर्षे समाजात आपल्या कार्याच्या जोरावर वेगळा ठसा उमटवलेला आहे आपल्याला या गोष्टीचे कोणती भांडवल करायचे नसून केवळ लोकांची सेवा करणे हाच आपला धर्म असल्याचे ते यावेळी म्हणाले ही मशीन मिळाल्यामुळे रुग्णांना होणारी ऑक्सिजनची कमतरता दूर होण्यास मदत होणार होणार असल्याचे सांगताना श्री भोसले यांचे दोडामार्ग रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवळे यांनी सुद्धा श्री भोसले यांचे आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page