तहसीलदार, नगराध्यक्ष बैठकीत निर्णय
*💫मालवण दि.१३-:* नियोजनाअभावी मालवणात कोरोना लसीकरणच्यावेळी उडालेल्या सावळा गोंधळामुळे आरोग्य विभागाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि तहसीलदार अजय पाटणे यांनी लसीकरण नियोजना बाबत तातडीची बैठक बोलाविली या बैठकीत ४५ वर्ष वरील ज्या नागरिकांना कोरोना लसीकरण पहिला डोस घ्यायचा आहे त्यांची नाव नोंदणी मालवण ग्रामीण रुग्णालय येथे सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत आणि दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत या वेळेत फोनद्वारे होणार असून (02365- 252032) या नंबर फोन केल्यावर नोंदणी क्रमांक दिला जाईल. त्या नुसार उपलब्ध लस साठ्यानुसार तसेच नोंदणी क्रमानुसार नागरिकांना लसीकरणसाठी बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील,बांधकाम सभापती मंदार केणी हेही उपस्थित होते ४५ वर्ष वरील ज्या नागरिकांचे लसीकरण राहिले आहे त्यांनी फोन द्वारे नाव नोंदणी करावी. असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
