मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या हस्ते उपक्रमाची करण्यात आली सुरुवात
*💫कुडाळ दि.१४-:* मनसेच्या माध्यमातून आज कुडाळ शहरात विविध ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. सद्य स्थितीत कुडाळ मध्ये रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने मनसेच्या माध्यमातून आज हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमाची सुरुवात मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या हस्ते जिजामाता चौक येथे श्रीफळ वाढवून करण्यात आला आहे. मनसेचे एस टी कामगार सेना राज्य उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला होता. यावेळी मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
