⚡मालवण ता.२४-:
मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित ओझर विद्या मंदिर कांदळगाव, तालुका- मालवण या माध्यमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २. ३० वाजता रोजी आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ.शोभा संजय पेडणेकर व उद्घाटक म्हणून माजी मुख्याध्यापिका श्रीमती यू.डी.मुरवणे ह्या उपस्थित राहणार आहेत
तरी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, पालक व विद्यार्थी यांनी स्नेहसंमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा.असे आवाहन ओझर विद्यामंदिर या शाळेच्या वतीने करण्यात येत आहे.
