⚡सावंतवाडी ता.२४-:
येथील कळसुलकर शाळेत आज फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन नवनिर्वाचित भाजप नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. सुधीर आडीवरेकर तसेच श्री.आनंद नेवगी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फूड फेस्टिव्हलमुळे विद्यार्थ्यांमध्ये खाद्यसंस्कृती व उपक्रमशीलतेला चालना मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
