श्रीधर काळे यांचे:मालवणात संत गाडगेबाबा पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न..
⚡मालवण ता.२३-:
संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचे महत्व सांगताना समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले. संत गाडगेबाबा यांचे विचार आज समाजातील प्रत्येक माणसाला आवश्यक आहेत, असे प्रतिपादन एलआयसीचे सेवानिवृत्त अधिकारी श्रीधर काळे यांनी येथे बोलताना केले.
श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघाच्या वतीने मालवण कोळंब येथे संत गाडगे महाराज पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी श्रीधर काळे हे बोलत होते. याप्रसंगी लेखिका मेघना जोशी, चंद्रकांत गोखले, कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण म्हापणकर, तालुकाध्यक्ष मोहन वालकर, खजिनदार आप्पा परुळेकर, सौ. पूजा करलकर, सौ. राधा मोंडकर, मोहन चिंदरकर, जयवंत चव्हाण, कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर, हेमंत वालकर, उत्तम चव्हाण, अनिल चव्हाण, सुभाष चव्हाण, अजित चव्हाण, बबन नेमळेकर, गोट्या कडू, सुजित नेमळेकर, शरद चव्हाण, दाजी कोळबकर, किरण चव्हाण, अर्जुन चव्हाण, दिलीप नेमळेकर, मुरलीधर गोवेकर, विजय हिंदळेकर आदी उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांत गोखले, मेघना जोशी यांनी संत गाडगेबाबा यांच्याविषयीचे विचार व्यक्त केले. सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन अशोक नेमळेकर व श्रीपाद कडू यांनी आपल्या निवासस्थानी केले. सौ माधवी वालकर यांनी दरवर्षीप्रमाणे हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संग्राम कासले यांनी केले.
