कांदळगाव येथील रामेश्वर मंदिरात १३ रोजी कलशारोहण वर्धापन दिन…

⚡मालवण ता.२४-:
कांदळगाव येथील देव रामेश्वर देवस्थान परिसर देवालये विश्वस्त मंडळातर्फे देव रामेश्वर मंदिर येथे कलशारोहणाचा २४ वा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दि. १३ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये सकाळी ८ वाजता लघुरुद्र, १० ते दुपारी १ या वेळेत तीर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसाद तसेच सायंकाळी ६ पासून स्थानिक भजने, रात्री १० वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर यांचा ‘गोमय गणेश’ नाट्यप्रयोग होणार आहे. बुधवार, १४ जानेवारी रोजी हळदीकुंकू समारंभाचे होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page