जनसेवा निधी बांदाचे 2025 चे पुरस्कार जाहीर’…

⚡बांदा ता.२४-: वितरण सोहळा 4 जानेवारी 2026 रोजी .सीमा पंडित, महादेव पवार ,नारायण चेंदवणकर, शरद चोडणकर यांचा समावेश.
. बांदा आणि आजूबाजूच्या परिसरासाठी आपल्या कार्याने अजरामर आणि म्हणूनच आराध्य असलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर खानोलकर . यांच्याच स्मृती प्रित्यर्थ जनसेवा निधी बांदा या संस्थेमार्फत दिले जाणारे 2025 साठी चे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत .आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कारासाठी श्रीदेवी माऊली विद्या मंदिर सातोसे च्या शिक्षिका सीमा दीपक पंडित तर आदर्श माध्यमिक शिक्षक पुरस्कारासाठी प्रगत विद्यामंदिर रामगड मालवण चे महादेव पुंडलिक पवार . नारायण यशवंत उर्फ नानातारी यांचे स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा आदर्श समाजसेवक पुरस्कार पर्यावरण प्रेमी ,प्रगत शेतकरी, मधमाशींचा तारणहार नारायण तुकाराम चेंदवणकर . यांना जाहीर झाला आहे .
एक थोर शिक्षण तज्ञ तसेच आदर्श प्रशासक कै . वि न . तथा तात्यासाहेब नाबर सरांच्या आदर्शवत कार्याच्या स्मृती अविरत जपण्यासाठी एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील एक आदर्श मुख्याध्यापक यांना गुरुवर्य तात्यासाहेब नाबर पुरस्काराने सन्मानित केले जाते . यावर्षी चा हा पुरस्कार .साकेडी पंचक्रोशी आदर्श विद्यालय करंजेचे मुख्याध्यापक शरद दत्ताराम चोडणकर यांना जाहीर झाला आहे
आदर्श प्राथमिक शिक्षिका सीमा पंडित 2007 मध्ये रायगड पोलादपूर येथून आपल्या सेवेची सुरुवात करून पुढे कारिवडे पेडवेवाडी व आता सातोसे येथे कार्यरत आहेत आपले विद्यार्थी हुशारच नव्हे तर नीती मूल्यांची जपणूक करणारे आदर्श नागरिक घडावेत यासाठी उत्तम अध्यापन करीत सामाजिक भान असलेले, विद्यार्थी हित जपणाऱ्या सीमा पंडित एक आदर्श शिक्षिका .तर माध्यमिक विभागात प्रगत विद्यामंदिर रामगड मालवणचे सहाय्यक शिक्षक महादेव पुंडलिक पवार यांना देण्यात येणार आहे एक उत्तम अध्यापक, द्रष्टे व्यक्तिमत्व असलेले पवार सर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मुलांच्या विकासासाठी मेहनत घेतात गणित विषयाच्या माध्यमातून मुलांच्या जीवनाचे गणित अचूक मांडण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले एक विद्यार्थी प्रिय व्यक्तिमत्व आदर्श माध्यमिक पुरस्काराने सन्मानित होत आहे . द .भिं . चे सोबती व एक उत्तम समाजसेवक नानातारी यांचे स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा आदर्श समाजसेवक पुरस्कार कुडाळ बांबुळी येथील नारायण तुकाराम चेंदवणकर यांना जाहीर झाला आहे स्वतः भूमीहीन अपुरा शिक्षण पण तरीही भगीरथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक प्रगतशील शेतकरी बचत गट शेतकरी शाळा महाविद्यालय कृषी महाविद्यालय कारागृहातील कैदी यांचे मार्गदर्शक मधमाशींचे तारणहार बनलेले एक उपयुक्त व्यक्तिमत्व
उत्तम प्रशासक म्हणून शरद दत्ताराम चोडणकर करं जे, नागवे सा केडी पंचक्रोशी आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक यांची निवड झाली आहे उत्तम प्रशासनाने आपल्या शाळेला प्रगतीपथावर नेणारे समाजातील विविध पुरस्काराने सन्मानित असे तोरण कर यांनी शाळेला सतत 15 वर्षे 100% निकालाची परंपरा निर्माण केली दहावी 2025 मध्ये बांदा केंद्रातील इंग्रजी मराठी गणित व विज्ञान विषयातील प्रथम क्रमांकाचे विजेते पूजा नारायण सावंत श्रीशा सखाराम सावंत कृपा मुनीस्वरंग स्वरा आप्पासाहेब भारमलकर तर बारावी परीक्षेतील विजेते सिद्धी अश्विनी कुमार वराडकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सन्माननीय अच्युत सावंत भोसले यांच्या शुभहस्ते पुरस्कारांचे वितरण रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी ठीक चार वाजता जिल्हा परिषद केंद्र शाळा बां दा .नंबर एक येथे संपन्न होणार आहे तरी सर्व द भी खानोलकर.प्रेमी शिक्षक वर्ग विद्यार्थी यांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे . ।

You cannot copy content of this page