वेंगुर्ला तालुका शिंदे शिवसेनेच्या निरीक्षक पदी विद्या परब यांची नियुक्ती…

संजू परब यांची घोषणा: लवकरच त्यांच्या अहवालानुसार नवीन कार्यकारणी जाहीर होणार, संजू परब यांची माहिती..

⚡सावंतवाडी ता.२४-:
वेंगुर्ला तालुक्यासाठी शिंदे शिवसेनेच्या निरीक्षकपदी जिल्हा बँकेच्या संचालक विद्या परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा संजू परब यांनी आज केली.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेने विद्या परब यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. लवकरच त्या वेंगुर्ला तालुक्याचा सविस्तर अहवाल पक्षाकडे सादर करणार असून, त्यांच्या सूचनेनुसार नवीन तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार आहे.
यावेळी संजू परब यांनी, वेंगुर्ला तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आपली मते, सूचना व अपेक्षा विद्या परब यांच्याकडे मोकळेपणाने मांडाव्यात, असे आवाहन केले. या नियुक्तीमुळे पक्ष संघटन बळकट होऊन आगामी निवडणुकांत शिंदे शिवसेनेला अधिक ताकद मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

You cannot copy content of this page