मालवण प्रभाग आठ हा उबाठा शिवसेनेचा गड असल्याचे पुन्हा सिद्ध…

मंदार ओरसकर:येत्या पाच वर्षात या प्रभागात अनेक विकासकामे केली जातील..

⚡मालवण ता.२३-:
मालवण प्रभाग आठ हा उबाठा शिवसेनेचा पारंपारिक गड असून आज माझ्या विजयाने हा प्रभाग उबाठा शिवसेनेचाच गड असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. विजयाचे यश हे माझ्या प्रभागातील लोकांचे आणि असंख्य निष्ठावंत उबाठा शिवसैनिकांचे आहे, असे उबाठा शिवसेनेचे विजयी उमेदवार मंदार ओरसकर यांनी विजयानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मालवण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग आठ अ मधून उबाठा शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार मंदार ओरसकर यांनी विजय मिळविला. विजयानंतर मंदार ओरसकर यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

प्रभाग आठ मधून मला अपेक्षेपेक्षा भरघोस मतदान झाले. उबाठा शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठीही या प्रभागातून वरचढ मतदान झाले. हा प्रभाग उबाठा शिवसेनेचा गड असून पुढील पाच वर्षे देखील हा गड राहणार आहे. येत्या पाच वर्षात या प्रभागात अनेक विकासकामे केली जातील, असेही मंदार ओरसकर यांनी सांगितले.

निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना मी शुभेच्छा देतो. मालवणसाठी पुढील पाच वर्षाची वाटचाल ही सर्व नगरसेवकांकडून प्रगतीची राहील. कोणतेही घाणेरडे राजकारम नं करता मालवण यां चार अक्षरासाठी सर्वपक्षीय नगरसेवक काम करतील अशी आशा आहे, असेही मंदार ओरसकर म्हणाले.

You cannot copy content of this page