नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांच्या हस्ते प्रकाशन; नगरसेवकांचा सत्कार..
⚡सावंतवाडी ता.२३-:
दरवर्षी प्रकाशित करण्यात येणाऱ्या भंडारी समाजाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आज सावंतवाडीत पार पडला. या दिनदर्शिकेचे प्रकाशन भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी भंडारी समाजातर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच भंडारी समाजातून निवडून आलेले नगरसेवक सुधीर आडीवरेकर, सुनीता पेडणेकर, देव्या सूर्याजी व देवा टेमकर यांचेही उत्स्फूर्तपणे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास भंडारी समाजाचे पदाधिकारी प्रसाद अरविंद लेकर, हनुमंत पेडणेकर, गुरुनाथ पेडणेकर, बिरजे, नंदकिशोर कोंडीये, सौ. शितल नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने भंडारी बांधव उपस्थित होते. समाजाच्या एकतेचे व सामाजिक उपक्रमांचे प्रतीक असलेल्या या दिनदर्शिकेच्या प्रकाशनामुळे उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
