मनिष दळवी यांच्या उपस्थितीत राजन गिरप यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला…

⚡वेंगुर्ला ता.२३-: वेंगुर्ला नगराध्यक्ष पदी भाजपचे दिलीप उर्फ राजन लक्ष्मण गिरप हे सलग दुसऱ्यांदा निवडून आले. आज सोमवारी दि. 22 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी नागरिकांच्या वतीने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवी मडगावकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुहास गवंडळकर, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, सुनिल नांदोस्कर, माजी नगराध्यक्ष दाजी परब, प्रशांत आपटे, शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे,रवी शिरसाट, रफिक शेख, माजी प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, पंकज केळुस्कर, हेमंत गावडे यांच्यासह कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page