⚡मालवण ता.१६-:
मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटीज् भंडारी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दि. १९ व २० डिसेंबर रोजी मामा वरेरकर नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे.
यामध्ये दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी ९. ३० वा. मामा वरेरकर नाट्यगृह येथे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण होणार असून त्यास उदघाटक म्हणून राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त उपसंचालक सतीश लळीत, प्रमुख पाहूणे म्हणून मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भंडारी एज्युकेशन सोसायटीचे सहखजिनदार अभिमन्यू कवठणकर तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, जॉईंट सेक्रेटरी चंद्रकांत मयेकर आदी मान्यवर उपस्थित राहणारं आहेत. यावेळी मान्यवरांचे सत्कार, बेस्ट स्टुडंट पुरस्कार वितरण, कनिष्ठ महाविद्यालय आदर्श विद्यार्थी पुरस्कार वितरण, स्व. टेमकर स्मृती पुरस्कार वितरण होणार असून मान्यवरांची भाषणे होणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ वा. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
तसेच दि. २० डिसेंबर रोजी सकाळी ८. ३० वा. माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम व दुपारी २. ३० वा. प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तरी यां कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबई च्या कौन्सील ऑफ मॅनेजमेंट, स्थानिक कमिटी आणि मुख्याध्यापक हणमंत तिवले यांनी केले आहे.
