⚡मालवण ता.१६-:
कुडाळ येथे झालेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत मुलींच्या १९ वर्ष वयोगटात कट्टा येथील वराडकर इंग्लिश मीडियमच्या दुर्वा राणे हिने तृतीय क्रमांक व गंगूताई पाटील हिने चतुर्थी क्रमांक पटकावला असून दोघींचीही कुडाळ येथे उद्या दि १७ डिसेंबर रोजी होणाऱ्या विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दुर्वा राणे व गंगूताई पाटील या दोघींनाही प्रशालेचे क्रीडा विभाग प्रमुख संदीप गोळवणकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल दुर्वा व गंगुताई हिचे प्रशालेचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर, ॲड. एस. एस. पवार, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, शालेय समितीचे अध्यक्ष सुधीर वराडकर तसेच सर्व संचालक व संचालिका यांनी अभिनंदन केले.
