ब्युटीशियन सौ. सायली मांजरेकर यांची कोकण रत्न पदवी पुरस्कार प्रदान…

⚡मालवण ता.१४-:
मालवण मधील ब्युटी पार्लर व्यवसायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. सायली सलील मांजरेकर यांना स्वतंत्र कोकणराज्य अभियाना तर्फे मुंबई येथे कोकण रत्न पदवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सौ. सायली मांजरेकर या गेली अनेक वर्षे मालवणात ब्युटीशियन म्हणून कार्यरत असून सायली ब्युटीपार्लरच्या माध्यमातून त्या शासनमान्य ब्युटीशियन कोर्स देखील घेत असून आजपर्यंत त्यांनी अनेक युवती व महिलांना ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिले आहे. तसेच सामाजिक कार्यातही त्या सक्रिय असतात. त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन त्यांना स्वतंत्र कोकणराज्य अभियाना तर्फे कोकण रत्न पदवीसाठी निवड झाली होती. शनिवारी मुंबई येथील मुंबई मराठी पत्रकार भवन येथे संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली व पत्रकार संपादक सचिन कळझूनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सौ. सायली मांजरेकर यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी स्वतंत्र कोकणराज्य अभियान मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे, नेते सुभाष राणे, सल्लागार दिलीप लाड आदी व इतर मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page