बांदा येथील नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूलची दुर्वा नार्वेकर लहान गटातून तृतीय…

तर मोठ्या गटातून वैभवी परब उत्तेजनार्थ..

⚡सावंतवाडी ता.१४-: बांदा येथील नट वाचनालयात घेण्यात आलेल्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेत लहान गटातून मळगाव इंग्लिश स्कूल मळगावची दुर्वा गोपाळ नार्वेकर हिने तृतीय क्रमांक पटकविला. तर मोठ्या गटातून वैभवी गोविंद परब हिने उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला.

कै. शशिकांत शांताराम नाडकर्णी, बांदा यांच्या कायम ठेव देणगीतून त्यांचे वडील कै. शांताराम कमळाजी नाडकर्णी व आई कै. शांताबाई शांताराम नाडकर्णी यांच्या स्मरणार्थ नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन शनिवारी १३ डिसेंबर रोजी बांदा नट वाचन मंदिरात करण्यात आले होते. या स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूलच्या दुर्वा नार्वेकर व वैभवी परब यांनी सहभाग घेत यश मिळविले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशस्वीतेसाठी व प्रशालेला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल यशस्वी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचे मळगाव ऐक्यवर्धक संघाचे अध्यक्ष शिवराम मळगावकर, सचिव आर. आर. राऊळ, शाळा समितीचे चेअरमन मनोहर राऊळ, मुख्याध्यापक मारूती फाले, पर्यवेक्षक विठ्ठल सावंत, प्रज्ञा मातोंडकर, सर्व संस्था पदाधिकारी व शाळा समिती पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, माता-पालक संघ, शिक्षक-पालक संघ, माजी विद्यार्थी परिवार यांनी अभिनंदन करून सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page