चराठा, ओटवणेत लसिकरण केंद्र

डॉ वर्षा शिरोडकर यांचे सरपंचाना आश्वासन

*💫सावंतवाडी दि.१३-:* चराठा आणि ओटवणे गावात कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी चराठा सरपंच बाळू वाळके, उपसरपंच जॉनी फेराव, ओटवणे सरपंचा उत्कर्षा गावकर यांनी सावंतवाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांचे लक्ष वेधले असता, निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कोविड लस उपलब्ध होताच तात्काळ दोन्ही गावात कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याची ग्वाही आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. ओटवणे – चराठा येथील ग्रामस्थांना 20 किलोमीटर अंतरावरील निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी जावे लागते सध्या लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्याने, प्रवासी वाहतुकीचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे निरवडे आरोग्य केंद्रावर जाणे शक्य होत नाही. दोन्ही गावे आरोग्य सुविधांसाठी 20 किलोमीटर अंतरावरील निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडण्यात आली आहेत. याबाबत लक्ष वेधण्यात आले होते.

You cannot copy content of this page