चराठा गावाला लस उपलब्ध करून दया

ग्रा प सदस्य अमित परब यांची मागणी;

*💫सावंतवाडी दि.१३-:* तालुक्यातील चराठा या गावात गेल्या ७ ते ८ दिवसात कोरोनाने ५ जणांचा मृत्यू झाला आहे. सावंतवाडी शहराच्या बाजूलाच हे गाव वसले असल्याने शहरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. आज कोलगाव ला २३० तर माजगाव ला १०० लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चराठा गावाला देखील लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी चराठा गावचे ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांनी केली आहे.

You cannot copy content of this page