Headlines

खनिकर्म मधून मिळालेल्या रुग्णवाहिकेचे आंबोली प्रा आ केंद्रात लोकार्पण

*💫आंबोली,दि.१३-:* येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला खनिकर्म विभागाकडून मिळालेल्या रुग्णवाहिका लोकार्पण आज करण्यात आले. आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका मिळाली आहे. याच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमा वेळी जिल्हा परिषद सदस्य सौ.रोहिणी विद्यासागर गावडे,सरपंच गजानन पालेकर,वैद्यकीय अधिकारी महेश जाधव,रुग्ण कल्याण समिती सदस्य गुलाबराव गावडे,पोलीस उपनिरीक्षक अमित गोते,विजय जाधव,अनंत गावडे,गोविंद जाधव,बालाजी ढोले,चालक रवी गावडे,श्री ठाकूर ,परिचारिका आदी उपस्थित होते.आंबोली आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका खराब झाली होती.आता नवीन रुग्णवाहिका मिळाल्याने परिसरातून समाधान वेक्त होत आहे.

You cannot copy content of this page