Headlines

खनिकर्म विभागाकडून प्राप्त रुग्णवाहिका मोरगाव पीएचसी केंद्राला प्रदान…

जिल्ह्या उपाध्यक्ष राजन म्हापसेकर यांनी दिली माहिती_

*💫दोडामार्ग दि.१३-:* खनिकर्म विभागाकडून घेण्यात आलेल्या १२ रुग्ण वाहिकेतील एक रुग्ण वाहिका दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव पीएचसी केंद्राला प्रदान आल्याची माहिती जिल्ह्या उपाध्यक्ष राजन म्हापसेकर यांनी दिली. गेली दीड वर्षे वारंवार प्रयत्न करत असलेल्या म्हापसेकर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला खनिकर्म विभागामार्फत एकूण १२ रुग्ण वाहिका देण्यात आल्या आहेत यावेळी म्हापसेकर म्हणाले की गेली दीड वर्षे आम्ही स्वता वारंवार रुग्ण वाहिका मिळण्यासाठी जीवाचे आटे-पाटे केले त्याचे आज फळ मिळाले असे म्हापसेकर म्हणाले. त्या १२ रुग्णवाहिकेतील अजून एक रुग्णवाहिका साटेली भेडशी आरोग्य केंद्राला येत्या आठवड्यात देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

You cannot copy content of this page