जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला भेट…

रुग्णालयातील परिस्थितीचा घेतला आढावा_

*💫सावंतवाडी दि.१२-:* जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत येथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी व्हेंटीलेटर, ऑक्सिजन बेडमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑक्सिजन जंबो सिलेंडरचा पुरवठा करण्याच नियोजन करण्यात आले आहे तसेच ३० बेडच प्राथमिक नियोजन असून टप्प्या टप्प्यानं बेडची संख्या वाढविली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, एमडी फिजीशिअयन, कर्मचारी अभावाबाबात विचारणा केली असता भरती प्रक्रिया सुरू असून तालुका स्तरावरच सीसीसीसाठी नियुक्त्या केल्या जात आहेत. वर्षभर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.।यावेळी एसपी राजेंद्र दाभाडे, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम पाटील, नगराध्यक्ष संजू परब, माजी आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, देव्या सुर्याजी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page