*💫बांदा दि.१२:-* शहरात अग्रेसर असलेले सार्वजनिक गणेशाेत्सव विठ्ठल मंदिर बांदा या मंडळाने बांद्यातील १५० गरीब गरजु कुटुबिंयाना काेराेना महामारीच्या काळात सरकारच्या आदेशाने लाँकडाऊन असल्याने दिला मदतीचा हात व जपली समाज बांधीलकी.गेली अनेक वर्षे हे मंडळ सामाजिक कार्यात.. अग्रेसर असुन ऱक्तदान शिबीर, गेल्यावर्षी काेराेना संकटाच्या काळातही गरजु कुटुंबियाना मदतीचा हात, दाेन वर्षापुर्वी बांदा शहरात तेरेखाेल नदीला आलेल्या पुराच्याही वेळी अनेक गरीब गरजु कुटुंबियाना अन्नधान्याचे वाट करुन एक वेगळा समाज सेवेचा आर्दश निर्माण केला हाेता. आज भारत देशावर काेराेनाचे महाभयंकर संकंट काेसळले आहे . या संकटावर मात करण्यासाठी काेराेना याेध्दा म्हणुन डाँव्टर, नर्स,पाेलीस कर्मचारी, शासकीय अधिकारी, सामाजीक कार्यकर्ते अहाेराञ मेहनत घेत आहेत. आपणही या देशसेवेत सहभागी व्हावे व समाज बांधीलकी जपावी या उद्देशान150 गरीब गरजु कुंटुबियाना जिवनावश्यक वस्तुचे वाटप केले. या कार्यक्रमाच्या वेळी सार्वजनीक गणेशाेत्सव विठ्ठल मंदीर बांदाचे अध्यश मंदार कल्याणकर, उपाध्यष साईप्रसाद काणेकर, सचिव राकेश केसरकर, खजिनदार ऊकार नाडकर्णी, ग्यानेश्वर येडवे, संदेश पावसकर, सर्वेश गाेवेकर, विषांत पांगम, रामचंद्र उर्फ भाऊ वाळके, राजेश विर्नाेडकर, समिर कल्याणकर, साई विर्नाेडकर, अर्णव स्वार, बाळा आकेरकर, निखिल मयेकर, अशय ऩाटेकर अथर्व पावसकर, निलेश कदम, प्रथमेश गाेवेकर, ज्याेतीनंद कुंभार, ऊकार नाटेकर, रामा येडवे, अजिक्यं पावसकर, गाैरव विर्नाेडकर, सुदेश येडवे,संकल्प केसरकर, कार्यकर्ते उपस्थित हाेते. यावेळी मंडळाचे अध्यष मंदार कल्याणकर य़ानी सर्वाना विनम्र आवाहन करताना प्रत्येकाने स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, साेशल डिस्टंसिग ठेवुन, मास लावुन सरकारी आदेशाचे पालन करावे हि विमंती केली , सर्व कार्यकर्त्यानी हे काेराेनाचे संकट लवकर दुर व्हावे सुख सम्रुध्दी यावी अशी बाप्पाच्यां चरणी प्रार्थना केली…
सार्वजनिक गणेशोत्सव विठ्ठल मंदिर कडून १५० गरीब कुटुंबांना मदतीचा हात
