लॉकडाऊन कालावधीत बाहेर फिरणाऱ्यांची वाढती संख्या पाहता तालुक्यात सर्वत्र कारवाई अधिक तीव्र;मालवण पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांची माहिती_
*💫मालवण दि.१२-:* संचारबंदी व लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी बुधवारी पाच दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. लॉकडाऊन कालावधीतही बाहेर फिरणाऱ्यांची वाढती संख्या पाहता तालुक्यात सर्वत्र कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांनी दिली आहे. बुधवारी सकाळ पासूनच पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व होमगार्ड पथकाने मालवण शहर व परिसरात कारवाई मोहीम तीव्र केली. संध्याकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. या कारवाई दरम्यान सर्व वाहनांना थांबवून कोणत्या कारणा साठी बाहेर आलात याची विचारणा सुरू होती. सद्या क्रिकेटप्रेमींकडून क्रिकेट खेळ सुरू असल्याने या खेळांमुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती आहे. त्यामुळे क्रिकेट खेळताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले. *
