मनसेच्या संदीप गवस यांची मागणी
*💫दोडामार्ग दि.१२-:* सध्या परिस्थितीत कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लसीकरण मोहीम राबविण्यासाठी प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे.परंतु प्रत्येक राज्यात तालुक्यात गावात या बाबत नियोजन करणे. अत्यंत महत्त्वाचे आहे. स्थानिकांना लस घेण्यासाठी होणारा त्रास स्थानिक पातळीवरील सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती , जि.प सभापती, जि.प सदस्य तसेच इतर समाजसेवकांनी सुध्दा लक्ष्य घालणे गरजेचे आहे.अशी मागणी मनसेच्या वतीने संदीप गवस यांनी केली आहे दोडामार्ग तालुक्यात कोरोना लसीकरण चालू आहे. या लसीकरणाचे प्रत्येक गावात कोरोना कूती समिती ने नियोजन करून गावांतील लोकांची होणारी पायपीट बंद करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उप तालुका अध्यक्ष श्री. संदिप वामन गवस यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग सरचिटणीस जीजी उर्फ परशुराम उपरकर सर्व जनतेचा हितासाठी प्रयत्न करीत आहेत. सध्या भेडशी व दोडामार्ग आरोग्य केंद्रात दररोज कोरोना लस मिळते म्हणून प्रत्येक गावातील ग्रामस्थ व महिला सकाळी ८.०० वाजता हजेरी लावतात. दोन दोन तास वाट बघितल्यानंतर मोजक्या लोकांना लस दिली जाते व लस संपल्याचे सांगून बाकींना परत पाठवले जाते. अशा वेळी अतिदुर्गम भागातील लोकांना याचा मोठा फटका बसतो. या प्रकाराला कुठे तरी लगाम बसणे गरजेचे आहे. याकडे तहसीलदार यांनी सुध्दा या विषयाकडे लक्ष घालून स्थानिकांना लसीकरणासाठी होणारा त्रास कमी होण्यासाठी प्रयत्न करावा. तहसीलदार यांनी प्रत्येक गावातील कोरोना कूती कमिटीला या बाबत सुचना देऊन गावात नियोजन करून आरोग्य केंद्राशी संपर्क करून नंतर गावातील लोकांना लसीकरणासाठी पाठविण्यात यावे. शक्यतो लोकांना होणारा नाहक त्रास , परिश्रम, आर्थिक बचत कमी होण्यासाठी मदत होईल. कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्रात नवनिर्माण सेना सर्व जनतेच्या पाठीशी आहे. प्रत्येकाने स्वत.ची काळजी घेणे गरजेचे आहे.असेही प्रसिद्धी पत्रकात मनसे दोडामार्ग तालुका उपाध्यक्ष संदिप वामन गवस यांनी मागणी केली आहे
