आंबोली आरोग्य केंद्राला अत्यावश्यक औषधे आणि ऑक्सीजन उपलब्ध करून द्यावेत…_

_▪️सामाजिक कार्यकर्ते वैभव राऊळ यांची सावंतवाडी पंचायत समिती सभापती निकिता सावंत यांच्याकडे मागणी_*

आंबोली, दि.११: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात टि टी (धनुर्वात) रेबीज अशी इंजेक्शन नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.।कोरोना काळात अशा इंजेक्शन ची येथील आरोग्य केंद्रात गरज असून उपलब्ध नाहीत. कोरोना लॉकडाऊन काळात तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक औषधे आणि इंजेक्शन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला उपलब्ध करून द्यावीत तसेच ऑक्सीजन उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव राऊळ यांनी सावंतवाडी पंचायत समिती सभापती निकिता सावंत यांच्याकडे केली आहे.

You cannot copy content of this page