संजू परब:धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या तिने उमेदवारांना भरघोस मंतानी निवडून द्या..
⚡सावंतवाडी ता.१९-: नगराध्यक्ष पदाच्या शिंदे शिवसेनेच्या आमच्या उमेदवारा ह्या सैनिकी घराण्यातील मुलगी आहे, सुशिक्षित अभ्यास वकिली पेशा असलेल्या आमच्या उमेदवार आहेत त्या रस्त्यावर कोणाला कधीही भेटू शकतात, त्यामुळे त्यांच्या नावासमोरील धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मंतानी निवडून द्या असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा शिंदे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी केले.
नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात कोरोना सारख्या महामारीची पर्वा न करता जनतेमध्ये जाऊन मी काम केले, घरात बसून राहिलो नाही त्यामुळे आमच्यासारख्या काम करणाऱ्या जनतेवर पुन्हा एकदा विश्वास टाका. माझ्या कारकीर्दीमध्ये जी जी कामे मला करता आली ती मी कामे केली उर्वरित जी कामे राहिली आहे ते येणाऱ्या काळातही आम्ही करू त्यामुळे आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या पाठीशी आपले मतदान रुपी आशीर्वाद आपण द्यावेत.
