आम. निलेश राणे थोड्याच वेळात कणकवलीत होणार दाखल..
कणकवली : आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडीची आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पहिलीच महत्त्वाची बैठक आज पार पडत आहे. ही बैठक माजी आमदार राजन तेली यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली असून, ठिकाणी झालेली प्रचंड गर्दी लक्षवेधी ठरत आहे. बैठकीत आमदार निलेश राणे काय भूमिका मांडतात, कोणता संदेश देतात, तसेच निवडणूक रणनितीबाबत कोणते संकेत देतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
या बैठकीच्या स्थळी माजी आमदार राजन तेली, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर, उपनेते संजय आंग्रे, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, काँग्रेसचे नागेश मोरये, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कन्हैया पारकर यांच्यासह शहर विकास आघाडीचे सर्व उमेदवार व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत. शहर विकास आघाडीच्या या मोठ्या शक्तीप्रदर्शनामुळे कणकवलीतील राजकीय वातावरण आणखी तापले असून, पुढील काही तासांत आमदार राणेंचे वक्तव्य शहरात चर्चेचा नवा विषय ठरणार आहे.
