हुपरी-इचलकरंजी येथून तिघांना अटक:न्यायालयाने दिली पाच दिवसांची पोलीस कोठडी..
⚡सावंतवाडी ता.०६-: पाणी मागण्याच्या बहाण्याने आंबोली नांगरतास येथे 60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पलायन केल्याप्रकरणी आंबोली पोलिसांनी अवघ्या बारा तासांच्या कालावधीत जलद तपास करून हुपरी इचलकरंजी येथून तिघांना जेरबंद केले. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
