भाजपच्या मोहिनी मडगावकर नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक…

.⚡सावंतवाडी, ता. ०६-:
भाजपच्या महिला शहराध्यक्ष सौ. मोहिनी मडगावकर या आगामी सावंतवाडी नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून इच्छुक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्य, संघटन बांधणी आणि महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निष्ठेने व प्रामाणिकपणे काम केले आहे. पक्षातील विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या असून, त्यांचे कार्य स्थानिक स्तरावर प्रशंसनीय मानले जाते.“पक्षाच्या माध्यमातून जनतेसाठी सातत्याने काम केले आहे. त्यामुळे पक्षाने नगराध्यक्षपदाची संधी द्यावी,” अशी अपेक्षा सौ. मडगावकर यांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page