⚡सावंतवाडी, ता.०६-: सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून त्यांचा पक्षप्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत काल रात्री पार पडला. या प्रसंगी भाजपचे सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांनी साळगावकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
दरम्यान साळगावकर यांच्या प्रवेशामुळे आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला नवे बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी मनोज नाईक, आनंद नेवगी, अमय पै आदी पदाधिकारी उपस्थित होते.
