बांद्यात उड्डाणपुलाखाली अपघात; कॅन्टरच्या धडकेत महिला गंभीर जखमी…

बांदा/प्रतिनिधी
. बांदा शहरात उड्डाणपुलाखाली श्रीराम चौकात कॅन्टरने दुचाकीला भरधाव वेगात धडक दिली. यात दुचाकीच्या पाठीमागे बसलेली महिला रस्त्यावर कोसळल्याने गंभीर जखमी झाली. बांदा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अपघात स्थळावरून पळून जाणाऱ्या चालकाला ताब्यात घेतले आहे. हा अपघात आज सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास झाला. दुचाकीवरील जोडपे सावंतवाडीहुन बांद्यात येत होते. तर कॅन्टर दोडामार्गहुन भरधाव वेगात बांदा शहरात येत होता. श्रीराम चौकात त्याने दुचाकीला जोरदार धडक दिली. पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे सहकारी पोलीस कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

You cannot copy content of this page